Homeविशेषनिर्भया निकाल दिनाचे औचित्य साधुन भरोसा सेल आणि निर्भया पथकाच्या वतीने स्वसंरक्षणासाठी...

निर्भया निकाल दिनाचे औचित्य साधुन भरोसा सेल आणि निर्भया पथकाच्या वतीने स्वसंरक्षणासाठी जनजागृती एकाच दिवशी शहरातील २६ शाळे मध्ये राबवला उपक्रम

advertisement

अहमदनगर दि.१६ डिसेंबर
निर्भया निकाल दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातील भरोसा सेल आणि निर्भया पथकाच्या वतीने गुरुवारी एकाच वेळेस अहमदनगर शहरातील एकुण २६ शाळा/कॉलेजमध्ये जावुन विदयार्थीनी व विदयार्थ्यांना जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये महिलांना कायदेविषयक ज्ञान व देण्यात आलेल्या सुविधांचा स्वसंरक्षणासाठी कशाप्रकारे वापर करावा या बाबत माहिती देण्यात अली तसेच शाळा कॉलेज अथवा शहरात वावरताना कोणी टवाळखोर मुलं त्रास देत असतील तर त्यांच्या बाबत तक्रार करण्यासाठी निर्भया पथकाडे असलेला मो.नं.९३७०९०३१४३ व १०९१, १०० नं तसेच ११२ हेल्पलाईन विषयी जनजागृती करुन स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.तसेच विदयार्थ्यांच्या मनातील पोलीसांबद्दलची भीती कमी व्हावी व त्यांच्यामध्ये सुसंवाद घडला जावा, सामाजिक बांधीलकी जपली जावी या उद्देशाने जनजागृती करण्यात आली.

निर्भया पथकातील एकुण ८ टिम तयार करुन न्यु आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेज, रेसिडेन्सिअल कॉलेज,प्रेमराज सारडा कॉलेज,राधाबाई काळे महाविदयालय,अंबिका विदयालय केडगाव,महाराणी ताराबाई कन्या विदयालय केडगाव,कारमेल कॉन्व्हेन्ट स्कुल केडगाव,जगदंबा महाविदयालय केडगाव,भिंगार हायस्कुल भिंगार,श्रीमती अँबेट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कुल व ज्युनिअर आर्टस कॉलेज भिंगार,सिताराम सारडा विदयालय,पार्वतीबाई डहाणुकर विदयालय,दादासाहेब रुपवते विदयालय,समर्थ विदया मंदिर,बजरंग विदयालय,आनंद विदयालय ,रुपीबाई बोरा विदयालय,अहमदनगर नगर कॉलेज,किशोर संस्कृत संवर्धिनी प्राथमिक शाळा, डॉन बॉस्को विदयालय,राघवेंद्र स्वामी मंदिर,काकासाहेब म्हस्केविदयालय,सन फार्मा ,भाग्योदय विदयालय केडगाव,ओयासिस स्कुल,एस.एस.मोहिते विदयालय केडगाव आशा एकुण २६ शाळा आणि कॉलेजमधील एकुण ५००० ते ५५०० इतक्या विदयार्थी, विदयार्थीनींना एकाच वेळी, एकाच दिवशी निर्भया पथकबाबत जनजागृती करण्यात आली पोलीस अधिक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक सौरभ अगरवाल, निर्भया पथकाच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांचे
मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.यु.बी.इंगवले, पो.हे.कॉ.ए.ए.आव्हाड, पो.हे.कॉ.बी.बी.पोकळे, म.पो.हे.कॉ.एस.टी.डिघुळे, म.पो.ना.ए.के.विधाटे,
,म.पो.ना.एस.बी.औटी, म.पो.ना.एस.एस.ढवळे, म.पो.ना.एस.एस.काळे, म.पो.ना.एस.आर.तोरडमल, म.पो.कॉ.एस.जी.पारधे,म.पो.कॉ.आर.आर.टोंबे, म.पो.कॉ.यु.टी.मोहारे, म.पो.कॉ.एस.व्ही.रोहोकले, म.पो.कॉ.एन.के.सुद्रिक, म.पो.कॉ.के.एस.खेडकर,
म.पो.कॉ.एम.बी.माळी यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular