अहमदनगर दि.१६ फेब्रुवारी
नगर शहरातील पत्रकार चौक येथे एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन गंभीर जखमी झाला आहे पत्रकार चौकामध्ये शहर वाहतूक शाखेच्या शेजारी असलेल्या रोडवर रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून नाकाबंदी साठी बॅरिकेट्स लावली जातात मात्र या बॅरिकेट्स वर रेडियाम नसल्याने आणि या ठिकाणी अंधार असल्याने रात्रीच्या वेळेस अनेक वेळा अपघात होतात.
मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका दुचाकीस्वार याठिकाणी जात असताना अंधारात बॅरिकेट्स न दिसल्यामुळे त्याला धडकून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी थांबून आणि पोलिसांनी मिळून या दुचाकीस्वारास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलीय मात्र या ठिकाणी लावले जात असलेल्या बॅरिकेट्सला पांढरा रंग देण्यात यावा अथवा रेडियाम लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे