Homeक्राईमपहाटे नागरकरांनी अनुभवला वेगाचा थरार इनोव्हाचा वेग तशी १२० चा मात्र कोतवाली...

पहाटे नागरकरांनी अनुभवला वेगाचा थरार इनोव्हाचा वेग तशी १२० चा मात्र कोतवाली पोलिसांनी लावली प्राणाची बाजी आणि पकडले चंदन तस्कराला १८,९६.८९० /- किंमतीचा मुद्देमालासह २आरोपी अटक

advertisement

अहमदनगर दि २४ फेब्रुवारी

अहमदनगर शहरात पहाटेच्या सुमारास नगरकरांनी अनुभवला गाडीच्या वेगाचा थरार घटना ही तशीच होती कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहीती नुसार काही चंदनचोर चारचाकी वाहनातून चंदनाचे लाकडे विक्रीसाठी नगर शहरात येत आहेत.

चंदन चोर हे जीवावर उदार होऊन हे काम करत असतात याचा अनुभव पोलिसांना असल्याने पोलिसांनी नगर सोलापूर रोड वरील चांदणी चौकात सापळा लावला मात्र पहाटे वाहतूक कमी असल्याने चंदन चोरांची गाडी पकडायची कशी यासाठी पोलिसांनी पहाटेच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याचा बनाव करत या ठिकाणी कृत्रिम वाहतूक कोंडी केली वाहतूक कोंडीत अलगत चंदन चोराची गाडी अडकेल असा पोलिसांचा कयास होता मात्र चंदन चोरट्याने यातूनही आपली गाडी काढली होती गाडीचा वेग प्रचंड होता मात्र तरीही जिवाची पर्वा न करता गुन्हे शोध पथकाच्या योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे,नितीन शिंदे, सलिम शेख,संतोष गोमसाळे,सागर पालवे,राजु शेख, अभय कदम,दिपक रोहकले,अमोल गाढे,सोमनाथ राउत,
अतुल काजळे ,वाबासाहेब तागड,प्रशांत बोरुडे यांनी गाडीचा पाठलाग करत सैनिक लॉन गेटजवळ गाडीला गाडी आडवी लावून चंदन चोरट्यांना ताब्यात घेतले.

 

MH १२ JU ५६४४ या इनोव्हा गाडीत असलेले सुभाष भिमराज दिलवाले वय ४७ वर्ष व गाडीचा चालक आणि राजेंद्र रंगनाथ सासवडे वय ३० वर्ष दोघे दोघांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता काही प्लास्टिकच्या गोण्या मध्ये भरलेले चंदनाचे लाकड आढळून आली चंदन विक्रीला बंदी असतानाही विक्री करण्यासाठी हि चंदनाचे लाकडे घेऊन जात असल्यामुळे कोतवाली पोलिसांनी ३७० किलो त्याची किंमत सुमारे 19 लाख 84 हजारांची चंदनाची लाकडे तसेच सात लाख रुपयांची ईनोवा गाडी आणि आरोपींकडे असलेले मोबाइल जप्त करून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध भा.द.वि.कलम ३७९,३४,सह भारतीय वन अधिनीयम १९२७ चे कलम ४१,४२,६६,६६ (अ) व महाराष्ट्र नियमावली २०१४ नियम ८२ व महाराष्ट्र अधिनीयम कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे, गुन्हे शोध पथकाचे पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/गणेश धोत्रे, पोना/नितीन शिंदे, पोना/सलिम शेख, पोना/संतोष गोमसाळे,पोना/सागर पालवे, पोना/राजु शेख, पोकॉ/अभय कदम, पोकॉ/दिपक रोहकले, पोकॉ/ अमोल गाढे, पोकॉ/ सोमनाथ राउत, पोकॉ/अतुल काजळे तसेच चापोहेकॉ/वाबासाहेब तागड, पोकॉ/प्रशांत बोरुडे यांनी केली आहे.

“कोतवाली पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात चंदन पकडल्यामुळे वन विभागाला खडबडून जाग आली असून वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली होती तसेच कोतवाली पोलिस स्टेशनचा तपास झाल्यानंतर या आरोपींना वनविभागाच्या ताब्यात घेण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे.”

“”दिलवाले हा या चांदतस्करी धंद्यात जुना आहे एम 80 ते इनोव्हा असा त्याचा गाडीचा प्रवास राहिला आहे.या आधी अनेक पोलीस ठाण्यात त्याच्यावर चंदन तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.””

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular