Home Uncategorized पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गांची घंटी वाजणार मंत्रिमंडळाचा निर्णय

पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गांची घंटी वाजणार मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिलीय.  ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen)करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलाय. अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवलाय. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version