HomeUncategorizedपाईपलाईन रस्ता कमीत कमी वीस वर्षे खराब होणार नाही यासाठी अत्याधुनिक मशनरीच्या...

पाईपलाईन रस्ता कमीत कमी वीस वर्षे खराब होणार नाही यासाठी अत्याधुनिक मशनरीच्या साह्याने डांबरीकरण काम सुरू – शहर अभियंता सुरेश इथापे

advertisement

अहमदनगर दि.९ एप्रिल (सुशील थोरात)
शहरातील रस्त्यावरून महापालिका प्रशासासन नेहमीच टार्गेट होत असते डांबरीकरण झाल्या नंतर काही दिवसात रोड खराब होत असल्याने नागरिकांसह राजकीय सामाजिक संघटना प्रशासनाला नेहमीच धारेवर धरतात.

सावेडी उपनगर मधील बहुचर्चित पाईपलाईन रोडचे काम सध्या सुरू झाले आहे हे काम चांगले आणि दर्जेदार व्हावे या करीता महानगर पालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे साध्य पाईपलाईन रोड वर कामाच्या ठिकाणी ठाण मांडून बसले असून रस्त्याच्या कामाच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्षपूर्वक नजर ठेवून आहेत.

या रस्त्या साठी ज्या ठिकाणावरून डांबर मिश्रित खडी येते त्या डांबर प्लांट वर महानगर पालिकेचा एक कर्मचारी तांत्रिक गोष्टींवर लक्ष ठेऊन असतो त्याचा प्रमाणे पाईपलाईन रोडवर कामाच्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे पेव्हर कामासाठी काम करणाऱ्या ठेकेदाराने उपलब्द करून दिले आहे. डांबरीकरण करण्याआधी हवेने सर्व माती साफ केली जाते त्या नंतर झाडूने पुन्हा रस्ता स्वच्छ केला जातो आणि नंतर त्यावर डांबरीकरण केले जाते रस्ता पक्का होण्याकरीता दोन व्हायब्रेटर रोलर रस्ता दाबण्याचे काम करत आहेत त्यामुळे चांगला रस्ता तयार होण्यास मदत होणार असून पावसाचे पाणी रस्त्यावर थांबू नये म्हणून दर मीटरला डांबराच्या जाडीची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिलीय.

नव्याने होत असलेल्या रस्त्याचे आयुष्य कमीत कमी 20 वर्ष असून रस्त्यावर पाणी साचून दिले नाही अथवा खांदण्याचे प्रकार झाले नाहीतर रस्त्याचे आयुष्य अजून वाढते त्यामुळे नागरिकांची रस्ता सांभाळण्याची तेवढीच जबाबदारी असून रस्त्यावर पाणी साचणार नाही अथवा खड्डे होणार नाही यासाठी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे असे आवाहन सुरेश इथापे यांनी नागरिकांना केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular