Homeशहरपाईपलाईन रस्त्याचे डांबरीकरण सुरू मात्र यशोदानागर समोरील ड्रेनेज लाईट फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे...

पाईपलाईन रस्त्याचे डांबरीकरण सुरू मात्र यशोदानागर समोरील ड्रेनेज लाईट फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य आशा परीस्थितीत रोडचे काम झाले तर नागरिकांचे पैसे पाण्यात जाणार

advertisement

अहमदनगर दि.९ एप्रिल
सावेडी उपनगर मधील पाईपलाईन रस्त्याला अखेर मुहूर्त लागला आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून रस्त्याचा कामाला वेग घेतला आहे.

नगरसेवकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्या मुळे रस्ता सुरू झाला खरा मात्र रस्त्याच्या काकाजात ड्रेनेज लाईन फुटल्याने व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

श्रीराम चौक ते भिस्तबाग रोड ते मनमाड रोड पर्यंत हा रोड डांबरीकरण होणार आहे सध्या श्रीराम चौका पासून कामाला सुरुवात झाली खरी मात्र त्या पुढील भागात म्हणजेच यशोदा नगर कमानी समोर ड्रेनेज लाईन फुटल्या मुळे सर्व पाणी रस्त्यावर साचले आहे या परिस्थितीत मध्ये काम सुरू केले तर रस्ता काही तास पण टिकू शकणार नाही हे वास्तव आहे त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाने डांबरीकरण करण्याआधी या ठिकाणी फुटलेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम सर्वात आधी हाती घेणे गरजेचे आहे नाही तर महापालिकेचा अर्थात जनतेचा पैसा पाण्यात जाईल.

रस्ता करण्याआधी ड्रेनेज लाईन किंवा पाण्याचा पाईप लाईन कुठे लिकेज आहेत किंवा तुटल्या असतील तर त्यांची दुरुस्ती करणे महापालिका बांधकाम विभागाचे काम आहे मात्र जर लिकेज दुरुस्त न करता तसेच ठेवले तर रास्त खराब होण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे या ड्रेनेज दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular