अहमदनगर दि. ३१ मार्च
अहमदनगर नगर शहरातील पाईपलाईन रोड ,गुलमोहर रोड, तारकपूर रस्ता काही दिवसांपासून ठीक ठिकाणी खांदून ठेवला आहे त्या मुळे हा रस्ता नव्हे तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या तीनही रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नरक यातना भोगण्याची सजा भोगल्याचा अनुभव नागरिक जिवंतपणे भोगत आहेत.
नागरीक खड्डे आणि धुळी मुळे त्रासले असून आता हा त्रास सहन करण्यापलीकडे गेल्याने नागरिक नगरसेवकांना धारेवर धरत आहेत अनेक नगरसेवक आणि नागरिकांमध्ये रोजच खडाजंगी होत आहे मात्र गेल्या महिन्यापासून शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत मात्र काम सुरू होत नसल्याने आज महानगर पालिके मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे , माजी नागरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक संपत बारस्कार, नगरसेवक सागर बोरुडे सुनील त्र्यंबके यांच्या सह या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून चांगलेच धारेवर धरले होते
ज्या ठेकेदारांना काम दिले आहे ते आमचं ऐकत नाही असं उत्तर जबाबदार अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिल्याने नगरसेवक संतप्त झाले होते शुक्रवार पासून काम चालू झाले नाही तर शनिवार पासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरदेवकांनी दिला आहे