पाथर्डी दि.५ एप्रिल
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रतापराव ढाकणे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना अँड.ढाकणे यांनी सांगितले की, पाथर्डी तालुक्यातील विविध गावांतील विकासकामांचे प्रस्ताव मागील महिन्यात मुंबई येथे मंत्री धनंजय मुंडे व अदिती तटकरे यांची भेट घेत सादर करण्यात आले.त्यानुसार तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील श्री.संत दर्शन मंदिर परिसर सुशोभीकरण व सभामंडप बांधण्याकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून ४० लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच सामाजिक न्याय विकास विभागाद्वारे कारेगाव येथे मागासवर्गीय युवकांसाठी व्यायामशाळा बांधण्यासाठी १५ लाख,कारेगाव येथीलच मातंग समाजाच्या स्मशानभूमीसाठी १० लाख,खरवंडीकासार येथील मातंग समाज वस्तीमध्ये समाजमंदिर बांधकामांसाठी १० लाख तर नांदूरनिंबादैत्य दलितवस्तीत कुपनलिकासाठी एक लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार तळागाळातील उपेक्षित व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी व्यापक दृष्टीकोनातून कार्यरत असून,सदरील कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल ढाकणे यांनी मंत्री मुंडे व तटकरे यांचे आभार मानले.