पारनेर दि.१७ डिसेंबर
पारनेर तालुक्यातील जवळा येथील एक खाजगी एटीएम सेंटर मधून एटीएम मशीनची चोरी १५ डिसेंबरच्या मध्यरात्रीस घडली होती.अवघ्या काही मिनिटातच ही चोरी करून चोरटे पसार झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. त्याच दिवशी नगर शहरातील औरंगाबाद रोडवर पेट्रोल पंप चालकास साडेतीन लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये पेट्रोल पंप चालक दिवसभराची पेट्रोल पंपावरील पेट्रोल विक्रीची सर्व रक्कम घेऊन घरी आला असताना. कंपाउंडचे गेट उघडण्यासाठी गाडी खाली उतरल्यावर अज्ञात चोरट्यांनी गाडीसह गाडीमधील साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती.
या दोन्ही घटनांमुळे पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्यात एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे.जवळे एटीएम प्रकरणातील एटीएम मशीन सापडली असून वाडेगव्हान कालव्या मध्ये फेकून दिल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या घटनेतील पेट्रोल पंप चालकाची गाडी नगर कल्याण रोडवर टायर फुटलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. मात्र दोन्ही घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही.पोलिसांनी विविध पथके तयार करून या दोन्ही घटनांचा तपास करण्यासाठी काही ठिकाणी पथक रवाना केले आहेत.