Homeजिल्हापोलिसां पेक्षा फास्ट नेटवर्क असणाऱ्या बीफ तस्करांना पकडणे एक आव्हानच आता स्कार्पिओ,...

पोलिसां पेक्षा फास्ट नेटवर्क असणाऱ्या बीफ तस्करांना पकडणे एक आव्हानच आता स्कार्पिओ, इनोव्हा, गाड्यांमधून होतेय बीफ तस्करी

advertisement

अहमदनगर दि.१५ फेब्रुवारी
अहमदनगर शहरात बीफ विक्रीचा व्यवसाय जोरात असून एकट्या अहमदनगर शहरात 25 ते 30 किरकोळ विक्रीचे दुकाने आहेत. गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यावर सरकारने बंदी घातली आहे मग बीफ विक्री करणारे किरकोळ विक्रेते आपल्या दुकानांमधून बिफ विक्री कसे करतात ज्यांच्याकडे विक्रीसाठी बीफ येथे कुठून याचा शोध घेणेही तेवढेच गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे नगर शहरातील काही हॉटेलमधून सर्रास बीफ विक्री केली जाते हेही नवलच म्हणावे लागेल भर रस्त्यावर पोलीस चौकीच्या आसपास ही हॉटेल आहेत.

गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्रीचा मोठा व्यवसाय अहमदनगर शहरात चोरीछुपे चालू आहे मात्र पोलिस छापे टाकत असल्याने आता काही ठिकाणी घरातूनच हा व्यवसाय केला जातो. तर पोलिसांना चकवा देण्यासाठी आता मोठ्या गाड्यांमध्ये बीफ न नेता छोट्या छोट्या गाड्या मधून मधून हे मास पुणे-मुंबई येथे सप्लाय केले जाते त्यासाठी इनोवा स्कॉर्पिओ अशा महागड्या गाड्या वापरल्या जातात .

गाडी मधील सर्व शीट काढून पोत्यां मध्ये मांस भरून ते मुंबई पुण्यापर्यंत पोहोचवले जाते अत्यंत सफाईदारपणे रात्री हा खेळ सुरू असतो एखादी गाडी भरली की दुसरी गाडी भरेपर्यंत भरलेली गाडी एका सरकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावली जातील जेव्हा दोन तीन गाड्या भरतात तेव्हा या गाड्या एकापाठोपाठ पुढे मागे असलेल्या दुचाकीवर असलेल्या खबऱ्यांच्या बंदोबस्तात शहराबाहेर पडतात.

पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी दुचाकी वर फिरणारे खबरे तसेच चौका चौकात बसणाऱ्या टोळक्या मध्ये खबरी असतात पोलिसांपेक्षा फास्ट नेटवर्क या तस्करांचा असल्यामुळे पोलीस येण्याची खबर लागताच काही मिनिटातच सगळं काही गळ्यातच सुपडासाफ केलं जातं.

संगमनेर येथे पोलिसांनी सर्जिकल स्ट्राइक करून कत्तलखाने समूळ नष्ट करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती तसेच अहमदनगर शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी शहर पोलिसांना सर्जिकल स्ट्राइक करावी लागणार आहे.

विशेष म्हणजे गोहत्या करण्यावर कायद्याने बंदी आहे सध्या अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी विचारसरणीची म्हणजे शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेत आहे मात्र तरही  गोहत्या बाबत शिवसेना गप्प का? हा प्रश्न पडतोय

संगमनेर मध्ये ज्याप प्रकारे पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली त्या प्रकारे नगर शहरातही अशी मोठी कारवाई करावी यासाठी आता काही हिंदुत्ववादी संघटना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular