Homeक्राईमपोलिसाला मारहाण करून पैसे मोबाईल घेऊन फरार होत असताना " आता तु...

पोलिसाला मारहाण करून पैसे मोबाईल घेऊन फरार होत असताना ” आता तु निंबोडीत ये मोबाईल व पैसे घेण्यासाठी मग पाहतो तुझ्याकडे ” असा दम देऊन पळून गेलेल्या गुन्हेगारांना कोतवाली पोलिसांनी केलं जेरबंद

advertisement

अहमदनगर दि.२४ जानेवारी

दहा जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आदिनाथ दिनकर शिरसाठ हे आपली ड्युटी संपल्या नंतर त्यांच्या मित्रासह घरी जात असताना नगर सोलापूर रोड वरील चांदणी चौकात एका दुचाकी वर आलेल्या अनोळखी इसमाने पोलीस कर्मचारी आदिनाथ दिनकर शिरसाठ यांच्या गाडीला धडक दिली या कारणा वरुन त्यांचेत वाद झाले. त्या मुळे पोलीस कर्मचारी शिरसाठ आणि त्यांचा मित्र हे कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार देण्या करीता येत असताना धडक देणाऱ्या आरोपी व त्यांचे साथीदार यांनी पोलीस कर्मचारी शिरसाठ आणि त्यांच्या मित्राला संत आण्णा चर्च येथे थांबवले आणि मारहाण केली तसेच खिशातील MI Note मोबाईल फोन व २०,०००/- रु रोख रक्कम ही बळजबरीने काढुन घेवुन फरार झाले.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं । २६/२०२२ भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना  २२ जानेवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना मिळालेल्या माहिती नुसार या गुन्ह्यातील आरोपी हे दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे आहेत त्या नुसार पोनि शिंदे यांनी तात्काळ तपासी अधिकारी सपोनि रविंद्र पिंगळे व गुन्हे शोध पथकाती कर्मचारी यांनी बोरिबेल येथे धाव घेऊन तेथील स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेवुन श्याम बाबासाहेब जाधव वय २० वर्ष,रोहन राजु जाधव वय २० वर्ष यांना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून मिळालेल्या माहिती नुसार त्यांचे साथीदार दिपक कचरु माळी वय २० वर्ष , विकास लक्ष्मण भालेराव वय २१ वर्ष सर्व रा निंबोडी ता नगर जि
अहमदनगर यांचे सोबत मिळुन केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी उर्वरीत दोन्ही आरोपींचा शोध घेवुन त्यांनाहीया गुन्ह्यात अटक करण्यात अली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, सपोनि रविंद्र पिंगळे, पोहेकाँ सतिश भांड, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे ,पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाँ अतुल काजळे, पोकाँ संदिप थोरात व सायबर पोस्टेचे पोकाँ राहुल गुंडू, पोकाँ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular