Home विशेष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘या’ टाकाऊ वस्तू मुळे पोलीस खाते...

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘या’ टाकाऊ वस्तू मुळे पोलीस खाते झाले लखपती!

अहमदनगर दि.१५ डिसेंबर
अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील विविध अस्थापनांमधील कागदपत्रांच्या रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये पोलीस खात्याला मिळले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार घेतल्या पासून विविध योजना राबवून पोलीस खात्यासह सामान्य नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल याचा विचार करून त्या योजना राबवल्या आहेत. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया मधील विविध आस्थापने मध्ये अनेक वर्षांची कागदपत्रे पडून होती. या कागद आणि फाईलीं मुळे जागाही अडवून ठेवली जात होती. त्यामुळे या सर्व कागदपत्रांची छाननी करून जे कागदपत्र लागत नाही असे कागदपत्रांचे गठ्ठे रद्दीमध्ये काढण्यात आले आहेत.१९९७, पासूनची कागदपत्रांची छाननी करून ही रद्दी काढण्यात आली या रद्दीच्या विक्री याबाबत निविदा काढून ही रद्दी विकण्यात अली सर्वात जास्त रक्कम असलेली निविदा एक लाखांच्या पुढे असून या मुळे पोलीस खात्याला मोठा फायदा झाला आहे. ही कागदपत्रे पोलिसांच्या उपस्थिती मध्ये रिसायकलिंग साठी नष्ट करण्यात येणार आहेत. या पूर्वी अशी सरकारी न लागणारी कागदपत्रे जाळण्यात येत असल्याची माहिती होती. मात्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेमुळे आता ही कागदपत्रे न जाळता रिसायकलिंग साठी देऊन पर्यावरणाच्या रक्षणासह पोलीस खात्याला फायद्याची ठरली आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version