Homeराजकारणप्रभाग क्रमांक ९(क) पोटनिवडणुकी साठी शिवसेनेच्या 'या' उमेदवाराचा अर्ज दाखल

प्रभाग क्रमांक ९(क) पोटनिवडणुकी साठी शिवसेनेच्या ‘या’ उमेदवाराचा अर्ज दाखल

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी –

अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९(क) च्या पोटनिवडणुकीसाठी आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश तिवारी यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. एकीकडे काँग्रेस बरोबर बोलणी करत असतानाच थेट अधिकृत उमेदवार जाहीर करून शिवसेनेने काँग्रेसवर कडी केली आहे. राष्ट्रवादीने आपली कोणतीही भूमिका जाहीर न करता थेट शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक उपस्थित असल्याने अर्ज महाविकास आघाडी कडून भरल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी नेमकी कोणती याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपच्या गोटात शांतता असून भाजप कडून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत एकमत होत नसल्याने फक्त चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तर काँग्रेस कडून सध्याचे विद्यमान नगरसेविकेचे पती माजी नगरसेवक इच्छुक असून त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीच्या काही नागरसेवकांसोबत  अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular