Homeराजकारणप्रभाग क्रमांक ९ (क) निवडणूक , ऐकावे कोणाचे पक्षाचे की मित्रांचे या...

प्रभाग क्रमांक ९ (क) निवडणूक , ऐकावे कोणाचे पक्षाचे की मित्रांचे या माजी नगरसेवका समोर मोठा प्रश्न

advertisement

अहमदनगर – दि.१६ डिसेंबर
प्रभाग क्रमांक 9 या सर्वसाधारण जागेसाठी या निवडणुकीमध्ये सध्या दिवसेंदिवस रंग चढत असून मालकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांना अपक्ष उमेदवार अजय साळवे यांनी पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली असली तरी काँग्रेस या निवडणुकीपासून अलिप्त आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार पत्रका वरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे काँग्रेसने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे काँग्रेसच्या निवडणुकीपासून दोन हात दूर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकी मध्ये सर्वात मोठी कुचंबणा झाली ती एका माजी नगरसेवकाची कारण नेहमी हसतमुख असलेला हा माजी नगरसेवक सर्वांच्या संपर्कात असतो. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच प्रमुख नेत्यांच्या अत्यंत जवळचा म्हणून या नगरसेवकाची ओळख आहे

आणि या पोटनिवडणुकीमुळे सध्या त्यांची मोठी कुचंबना झाल्याचे दिसून येत आहे.या प्रभागातील उभे असलेले काही उमेदवार या माजी नगरसेकाची खाजगीत भेट घेऊन सहकार्य करावे अशी मागणी करत आहेत.या माजी नगरसेवकाचे प्राबल्य या प्रभागात मोठे असल्याने आणि जनसंपर्क दांडगा असल्याने सर्वच उमेदवारांना या माजी नगरसेवक कडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला मदत करायची हा मोठा प्रश्न आता या नगरसेवक समोर उभा राहिला आहे. आता या नगरसेवका समोर पक्षाच्या नेत्यांचा ऐकायचं का प्रभागातील या सर्व जवळच्या उमेदवारांचा ऐकायचं आहे मोठा प्रश्न उभा राहिला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular