Homeजिल्हाप्रवीण गीतेंची ओडिसा नॅशनल पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

प्रवीण गीतेंची ओडिसा नॅशनल पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

advertisement

अहमदनगर – राष्ट्रीय अपंग खेळाडू कथा अहमदनगर काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण भैय्या गीते पाटील यांची ओडिसा येथे पार पडणाऱ्या नॅशनल पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. हे स्पर्धेचे चौथे वर्ष असून ही राष्ट्रीय स्तरावर ती अत्यंत महत्त्वाची स्पर्धा मानली जाते.*

ही स्पर्धा २४ ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान ओरिसाच्या भुवनेश्वर या ठिकाणी पार पडणार आहे. गिते अहमदनगर येथील वाडीया पार्क येथील बेटलडोर स्पोटर्स अँकेडमी मध्ये सराव करत आहे. त्यांना या स्पर्धेच्या तयारीसाठी क्रिडा अधिकारी विशाल गर्जे सर व प्रशिक्षक मल्हार कुलकर्णी सर हे मार्गदर्शन करीत आहेत.

गीते यांनी आजवर अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र संघामध्ये गीते यांच्या रूपाने अहमदनगरला स्थान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गीते यांच्या निवडीबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींनी अभिनंदन केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular