HomeUncategorizedप्रश्न अतिक्रमणाचा उपोषणाला पाठींबा सत्तेतील विरोधातील सर्वपक्षीयांचा, मग हातावर पोट असलेले पथविक्रेते...

प्रश्न अतिक्रमणाचा उपोषणाला पाठींबा सत्तेतील विरोधातील सर्वपक्षीयांचा, मग हातावर पोट असलेले पथविक्रेते श्रीलंका, बांग्लादेशातून आलेले आहेत का?

advertisement

अहमदनगर दि ३० मार्च
अहमदनगर शहारत सध्या बाजापेठेतील अतिक्रमण वरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. व्यापारी विरुद्ध पथविक्रेते असा चित्र दिसत असले तरी यात राजकीय पक्षांची भूमिका संशयास्पद आहे.

कापड बाजारातील एका व्यापाऱ्याचे आणि रोडवर बसणाऱ्या पथविक्रेत्याचे भांडण झाल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले होते. त्याच प्रमाणे काही हिंदू संघटना , मनसे राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसनेही व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता.

मग प्रश्न असा पडतो की व्यापारी नगर शहरातले आहेत आणि पथविक्रेते परराज्यातील अथवा परदेशातील आहेत का ? कारण त्यांच्या बाजूने एकाही पक्षाने उभा राहण्याची भूमिका का दाखवली नाही हे सर्व बाहेरील नागरीक आहेत आणि नगर शहारत येऊन दमदाटी करून कापड बाजारात अतिक्रमण करून बसले आहेत का? तर तसंही म्हणता येणार नाही कारण बुधवारी महानगरपालिकेवर काढलेल्या मोर्चा मध्ये पथविक्रेत्यांनी आपली आधार कार्ड दाखवत आपण भारतीय नागरिक असून नगर शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

महापालिका, विधानसभा ,लोकसभा निवडणुकीला याच लोकांच्या समोर हात जोडून मत मागणाऱ्या लोकांना हे समजायला हवं. मग नेमकं यामागे राजकारण काय असाच प्रश्न समोर येतोय महानगरपालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे काँग्रेस आणि भाजप यांचीही या सत्तेला मूकसंमती असल्याचं अनेक वेळा अनेक निर्णयावरून समोर येत आहे. मग चारही पक्षांची सत्ता महानगरपालिकेवर असताना अतिक्रमण काढायला कितीसा वेळ लागणार होता ज्या लोकांकडे अपेक्षेने पथविक्रेते आले होते त्याच लोकांनी व्यापाऱ्यांना पाठिंबा देऊन या कष्टकरी गोरगरीब जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.जर हे पथकर विक्रते परकीय नागरीक असतील तर नक्कीच त्यांना हाकलून द्या मात्र हे नागरिक नगरच्या मातीतील असतील तर यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडणार? राजकीय पक्षांना व्यापाऱ्यांची एवढीच काळजी होती तर त्यांनी पहिल्या दिवशी या अतिक्रमणाबाबत गांभीर्याने भूमिका घेत महानगरपालिकेच्या एखाद्या मोकळ्या भूखंडावर या सर्व अतिक्रमणधारकांना जागा करून देण्याची खंबीर आणि तातडीची भूमिका घेणे गरजेचे असताना सत्ताधारी पक्ष व्यापाऱ्यांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांना जाहीर पाठिंबा देत भाषण ठोकण्याचा चित्र नागरकरांनी पाहिले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या भूमिकेवर संशय येण्यास सुरुवात झाली आहे अजूनही या पथविक्रेत्यांच्या प्रश्न बाबत राजकीय पक्षाने अथवा महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या आशेने हे रोडवरील विक्रेते राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राजकीय पक्षांनी केले आहे. कापड बाजार अतिक्रमणमुक्त होणे गरजेचे आहे मात्र त्याचबरोबर या ठिकाणी हातावर पोट असलेल्या रोडवरील विक्रेत्यांन बाबत योग्य भूमिका करणे तेवढेच गरजेचे आहे व्यापाऱ्यांनीही याबाबत त्यांच्या जागेसाठी आपण त्यांच्या मागे उभा राहु असे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर पथविक्रेत्यांच्या बाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण येणारा काळ हा सण सुदीचा असल्याने हातावर पोट असलेल्या या पथविक्रेत्यांसाज कुटुंब आशाळभूत नजरेने तुमच्याकडे पाहत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular