कर्जत प्रतिनिधी-
शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कर्जत शहरातील बालाजी नगर या भागात एक वाळू वाहतूक करणारा डंपर कर्जतचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या निदर्शनास आला होता प्रांताधिकारी थोरबोले यांनी याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली व सदर वाळूच्या ट्रकची चौकशी करण्यास सांगितले . तहसीलदार नानासाहेब वागळे यांनी आपल्या पथकासह डंपर ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता.या डंपरमध्ये जवळ तीन ब्रास वाळू होती.ही वाळू अवैधरीत्या आणल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना कळवली प्रांत अधिकाऱ्यांनी या गाडीवर तातडीने कारवाई करण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी आलेला एका इसमाने आपण पोलिस असल्याचे सांगत कारवाई करण्यास मज्जाव केल्यानंतर प्रांत अधिकारी डॉक्टर अजित नवले यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन तू एकच नंबर प्रांताधिकारी कार्यालयात घेण्याचा आदेश आपल्या पथकाला दिले.मात्र डंपर चालकाने आणि त्या ठिकाणी आलेल्या एका अज्ञानी सामने आपण पोलिस असल्याचे सांगत तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना आणि महसूल पथकाला दमदाटी करत वाळूचा डंपर खाली करत पळून गेला. या प्रकरणा नंतर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये सहा तास प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी ठाण मांडून होते अखेर या प्रकरणात तलाठी दीपक बरुटे यांच्या फिर्यादी वरून पोलीस असल्याचा सांगणाऱ्या त्या ईश्वर व्हरकटे यांच्यासह डंपर चालक आणि एका अज्ञात इस्मा विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष मध्ये प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे त्या वाळूतस्कराने प्रांत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली असल्याची माहिती समोर येत आहे मात्र गुन्हा दाखल करताना सरकारी कामात अडथळा आणल्याचा कोणताही कलम लावण्यात आलेला नाही. पोलीस आणि महसूल यांच्या संयुक्त कारवाईत अनेक वेळा वाळू तस्करांवर कारवाई होते मात्र वाळू तस्कर एवढे मुजोर का झालेत ते या कारवायांना न घाबरता नेहमीच महसूल आणि पोलिसांना टार्गेट करत त्यांना मारहाण करण्याचे धाडस करत आहेत या सर्व वाळू तस्कर मागे नेमका कोणता मोठा हात आहे हे शोधण्याची गरज आता पोलीस आणि महसूल प्रशासनाला पडली आहे
एकीकडे कर्जत तालुक्याचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी धाडसी कारवाई करत कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करांवर कारवाई केले आहेत याचे नागरिकांनी कौतुक केलेआहे .मात्र काही आशा पोलिसांमुळे पोलिसांसमोरच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता पोलिसांना पोलिसांची चौकशी करण्याची वेळ आली आहे.