HomeUncategorizedप्रोफेसर कॉलनी चौकात पुन्हा रोड दुभाजक बसवण्याचे काम सुरू रोज होणारी वातुकीची...

प्रोफेसर कॉलनी चौकात पुन्हा रोड दुभाजक बसवण्याचे काम सुरू रोज होणारी वातुकीची कोंडी टाळण्यास होणार मदत

advertisement

अहमदनगर दि.३ जानेवारी
नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पत्रकार चौकात महापालिकेच्यावतीने पुन्हा एकदा रस्ता दुभाजक लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावर काही भागांमध्ये रस्ता दुभाजक लावण्यात आले होते रस्ता डांबरीकरण करत असताना काढून टाकण्यात आले होते.

प्रोफेसर चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक झाला असून या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात त्या वेळी आलेले वाहन धारक रस्त्याच्या मधोमध एक आपल्या चारचाकी गाड्या लावत असल्याने या ठिकाणी इतर व्यापाऱ्यांना याचा त्रास होत होता. तसेच या चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रोड मध्ये लावलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत होत.

 

पोलिसांनी या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध लावलेल्या गाड्यांवर अनेकवेळा दंडात्मक कारवाई केली होती मात्र या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध चार चाकी गाड्या लावण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते तर रस्त्याच्या मधोमध लावलेल्या गाड्यांमुळे अनेक वेळा वाद झाले होते.अखेर महानगरपालिकेने पुन्हा एकदा रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्याचे काम हाती घेतले असून यामुळे चौकातील रात्री होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular