मुंबई, ६ मार्च –
पिंपरी चिंचवडमध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा राडा झाला माजी मुख्यमंत्री भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फिरकावण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे भाजप आक्रमक झाली आहे. फक्त २४ तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पला घालतो, अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
‘देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरता कसे ते आम्ही बघतो त्यांना जागोजागी चपलांचा हार घालतो मग चपला मोजायचे काम त्यांनी करावं, भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही’ असा इशारा राणेंनी दिला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर मध्ये कार्यकर्ते संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.