Homeनोकरीफेब्रुवारी महिन्याची प्रेमाची तारीख उजाडली तरी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार नाहीच...

फेब्रुवारी महिन्याची प्रेमाची तारीख उजाडली तरी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार नाहीच…

advertisement

अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी
अहमदनगर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाला तर तारेवरची कसरत करत सध्या काम करावे लागत आहे.

वसुलीचा टक्का कमी असल्याने महानगर पालिकेला दर महिन्याला पगार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असून फेब्रुवारी महिन्याची १४ तारीख आली तरी अद्यापही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना उधारीचा आधार घ्यावा लागत आहे.

प्रचंड महागाई वाढल्यामुळे महिन्याचे आर्थिक नियोजन आधीच कोलमडले असून त्यात अनियमित पगार झाला तर कर्मचाऱ्यांना अजून एका संकटाला सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्यातील सहा तारखेच्या पुढे पगार जमा झाला होता मात्र फेब्रुवारीचे चौदा दिवस उलटूनही पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मनपाच्याया काही चाऱ्यांचे आयकर विवरण पत्र देण्यास उशीर होत असल्याने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पगार उशिरा होत असल्याची माहिती मिळली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular