अहमदनगर प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘त्या’ अधिकाऱ्याचे प्रताप एकेक करून बाहेर येत असून शनिवारी सकाळी लागलेल्या आगीनंतर नाशिकच्या उच्च अधिकाऱ्याला चुकीची माहिती देत तसेच पोलिस यंत्रणेलाही चुकीची माहिती देऊन त्या अधिकाऱ्याने खोटं बोलण्याचा कळस गाठला होता तर आज थेट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे नगर मध्ये आले असता त्यांना सुद्धा ‘या’ अधिकाऱ्याने फसवले आहे जळीत झालेल्या त्या कोविड वॉर्ड मधील फक्त पश्चिम बाजूनेच आग लागून त्या ठिकानाचेच रुग्ण दगावले असल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने आरोग्यमंत्रना दिली तर दुसरीकडे म्हणजे उत्तरेकडील बाजूस असलेले रुग्ण व्यवस्थित असल्याचं सांगितलं गेलं मात्र वास्तविकता अशी अहे की जळालेल्या कोविड वॉर्ड मध्ये पश्चिम आणि उत्तर बाजू सह पश्चिम बाजूचे तीन रुग्ण दगावले असताना त्या अधिकाऱ्याने फक्त आरोग्यमंत्र्यांना फक्त पश्चिम बाजूस तिच्या जवळ आग लागून त्या बेड वरील रुग्ण दगावल्याची खोटी माहिती दिली यामुळे अधिकारी अजून किती खोटं बोलणार असा प्रश्न उपस्थित राहत आहे. याबाबतचा पंचनामा पोलिसांनी केला आहे त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाकडून जो पंचनामा झाला आहे ते मागून घेतल्यास त्या अधिकाऱ्याने आपल्याला कसे फसवले हे लक्षात येईल