अहमदनगर दि ६ मार्च
राज्यात बंदी असतानाही गुटखा व माव्याची नगर जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरू असल्याचे वेळो वेळी झालेल्या पोलीस करवाईतून उघड झाले आहे. कोतवाली पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा(वय 42, एमआयडीसी, नगर) व अभिजित गोविंद लाटे (वय 34, रा. पाईपलाईन रोड) यांना गुटखा विकताना पकडले होते त्यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील गोडावून मध्ये छापा टाकून 1 कोटी 6 लाखाच्या गुटख्यासह सुंगधित तंबाखू व गाड्या जप्त केल्या होत्या.
याप्रकरणी राहुल कलासनाथ सिंग (वय 24 रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) अझर शकील शेख (वय 39 रा. दावल मालिक चौक, बोल्हेगाव), चंद्रकेश शोभनाथ तिवारी (वय 50 रा. उत्तर प्रदेश), शिवप्रकाश रामकुमार तिवारी (वय 48 रा. रामडिडीया उत्तर प्रदेश), मोहसिन शब्बीर पटेल (वय 36, बोल्हेगाव नवनाथनगर), अर्जुन शंकर यादव (वय 46, वरळी कोळीवाडा वारसलेन, मुंबई), नितीन सुनिल साठे (वय 32 रा. सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव), शादाब शब्बीर पटेल (वय 29 बोल्हेगाव, नवनाथ नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती तर पत्र्याच्या गोडाऊन शेडचा मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा आद्यपही फरार आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सर्जिकल स्ट्राइक करत थेट तोफखाना पोलिसांच्या हद्दी मध्ये जाऊन हा गुटखा पकडला होता त्यामुळे पोलीस दलात चांगलेच वादंग निर्माण झाले होते तसेच या गुटख्याच्या छाप्या मुळे पडद्याआड अनेक घटनाही घडल्या आहेत त्यामुळे हा छापा चांगलाच चर्चेत राहिला होता.
या प्रकरणात पोलिस कोठडी संपल्यानंतर या प्रकरणातील आरोपींनी अहमदनगरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलिंद वि. कुर्तडीकर यांच्या न्यायालयात जमिनीसाठी अर्ज ठेवला होता.त्यावर सुनावणी होऊन आरोपी अझहर शकील शेख याच्यासह राकेश प्रसाद जगदंबप्रसाद मिश्रा,अभिजित गोविंद लाटे,मोहसीन शब्बीर पटेल, अर्जुन शंकर यादव, नितीन सुनील साठे आणि शादाब शब्बीर पटेल यांची काही अटी आणि शर्तींवर सुटका करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींचा वतीने ऍड. महेश तवले आणि ऍड. विक्रम शिंदे यांनी काम पाहिले असून सर्व आरोपींना २५ हजारांचा पीआर बॉण्ड सादर करणे, दर शनिवारी कोतवाली पोलिस ठाण्यात हजेरी लावणे तपासात सहकार्य करणे,जामिनावर असताना त्याने असा गुन्हा करू नये या अटी शर्ती वर जमीन मिळाला असून राकेशकुमार उर्फ राकेश प्रसाद जगदंबप्रसाद मिश्रा, याला अहमदनगर शहरातील स्थानिक जामीनदार देण्यास सांगितले आहे.
काही आरोपींच्या जमिनीवर सोमवारी सुनावणी होणार असून या प्रकरणाचा तपास आता थंड होण्याची शक्यता आहे.कोतवाली पोलिसांचे काही पथके परराज्यात या गुटख्याचे मूळ शोधण्यासाठी गेले होते मात्र पोलीस तेथे पोहचण्याआधीच तेथे पोलिस येेेण्याची खबर लागल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागले नसून पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागले आहे.