अहमदनगर प्रतिनधी
अहमदनगर जिल्ह्यात गाजत असलेल्या बायोडीझेल प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तपास करत असताना या प्रकरणामध्ये शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांचे नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनामधून शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पदाला स्थगिती देण्यात अली की पदावरून काढून टाकण्यात आले या बाबत शिवसैनिकांमध्ये मतमतांतर होते. सुथोयाबाबत शिवसेनेचे अहमदनगर संपर्कप्रमुख प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी
दिलीप सातपुते यांच्या पदाला फक्त स्थगिती दिल्याचं सांगितले आहे. तसेच शिवसेनेमध्ये स्थगिती बाबत अथवा नवीन नियुक्ती बाबत कोणतेही पत्र दिले जात नाही शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जे आदेश येतात तेच शिवसेनेचे पत्र असल्याचं भाऊ कोरगावकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिलीप सातपुते यांची हकालपट्टी झालेली नसून त्यांच्या पदाला फक्त स्थगिती देण्यात आल्याचं दुजोरा भाऊ कोरगावकर यांनी दिला आहे.