Homeक्राईमबायोडिझेल पोलिसांनी पकडले पुन्हा दोन टँकर

बायोडिझेल पोलिसांनी पकडले पुन्हा दोन टँकर

advertisement

पाथर्डी- दि.५ जानेवारी

संशयास्पद रासायनिक द्रव्य वाहतूक करणाऱ्या दोन टँकर पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस कॉन्स्टेबल संदीप विनायक बडे यांनी श्री काशी विशवनाथ एन्टरप्राइजेस व अग्रवाल एन्टरप्राइजेस यांच्या मालकीच्या दोन्हीही कंपनीवर विनापरवाना बेकायदेशीररीत्या बनावट कंपनीच्या नावाने ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अहमदनगर शहरात आणि परिसरात प्लॉट, फ्लॅट, बंगले ,शेती खरेदी विक्रीसाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा सार्थ इस्टेट एजन्सी 8999306565

विनापरवाना रासायनिक द्रव्याची वाहतूक करणारे ५४ लाख रुपये किमतीचे दोन टँकर पाथर्डीच्या स्थानिक पोलिसांनी पकडले असून या टँकर मध्ये १९ लाख रुपये किमतीचे कोणते रासायनिक द्रव्य आहे या विषयी साशंकता वाढली आहे. पाच दिवसांपूर्वी तालुक्यातील शेकटे शिवारात रासायनिक द्रव्याची वाहतूक करणारे दोन टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले. या पैकी एक टँकर हा नांदेड येथील श्री काशी विशवनाथ एन्टरप्राइजेस यांच्या मालकीचा तर एक टँकर हा अग्रवाल एन्टरप्राइजेस सुरत या कंपनीचा आहे.

अहमदनगर शहरात आणि परिसरात प्लॉट, फ्लॅट, बंगले ,शेती खरेदी विक्रीसाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा सार्थ इस्टेट एजन्सी 8999306565              

दोन्हीही टँकरच्या चालकाकडे पोलिसांनी या टँकर मध्ये नेमकी कोणते रासायनिक द्रव्य आहेत,वाहतूक परवाना आहे कि नाही,हे द्रव्य नेमके कुठून कोठे नेले जात आहे याची चौकशी केली असता टँकर चालकांनी उडवाउडवी ची उत्तरे दिल्याने पोलिसांनी दोन्हीही चालक व टँकर ताब्यात घेत पोलीस स्टेशनच्या आवारात आणून लावल्या नंतर ज्या कंपनीच्या मालकीचे हे टँकर आहेत तेथील मालकांनी पोलिसांशी संपर्क करत कागदपत्रे लवकरच सादर करतो मात्र तो पर्यंत टँकर सोडून द्या अशी विनंती स्थानिक पोलिसांना केली मात्र गेली चार दिवस उलटूनही ही कागदपत्रे सादर न केल्याने अखेर पोलिसांनी या टँकर मधील रासायनिक द्रव्य नेमके काय आहे हे तपासण्यासाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरी क्षक सुहास चव्हाण हे करत आहेत.

 

अहमदनगर शहरात आणि परिसरात प्लॉट, फ्लॅट, बंगले ,शेती खरेदी विक्रीसाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा सार्थ इस्टेट एजन्सी 8999306565

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular