अहमदनगर दि.१६ डिसेंबर
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून हा व्हिडीओ काही पेट्रोलियम पदार्थांच्या टँकरवर काही लोक चढुन पाहणी करत असल्याचा व्हिडिओ आहे.या टँकरमधून काही पदार्थ बाहेर काढल्याचे दिसून येत आहे मात्र व्हिडिओ मधील लोक कोण आहेत हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.सध्या अहमदनगर जिल्ह्यात बायोडिझेल प्रकरण मोठे गाजत आहे पुरवठा विभाग आणि पोलिसांनी अवैध बायोडिझेल विक्रीवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे यादरम्यानच हा प्रकार किंवा हा व्हिडीओ रेकॉर्डिंग झाल्याचे समजते आहे.तपासणीसाठी या टँकर मधून काही पदार्थ काढले का ? किंवा अजून काही याबाबत व्हिडिओ ची सत्यता तपासूनच नंतर या व्हिडिओ बाबत आरोप करणे योग्य ठरणार आहे.
पहा तो व्हायरल व्हिडीओ