अहमदनगर दि १७ मार्च
सध्या बारावीचे पेपर सुरू असून बारावीचे पेपर फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत तीन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा येथे गणिताचा पेपर परीक्षेच्या आधीच काही तास बाहेर आल्याची घटना घडली होती. याबाबत तातडीने शिक्षण विभागाने श्रीगोंदा येथे जाऊन चौकशी करून शहानिशा केली होती ही घटना ताजी असतानाच आज 12 वी चा सायन्स विभागाचा बायोलॉजी या विषयाचाचा पेपर पुन्हा सोशल मीडियावर आला आहे.
साडेदहा वाजता पेपर असताना साडेनऊ वाजताच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे आता ही पेपर फुटी शिक्षण विभागाची एक डोकेदुखी ठरू लागलीआहे आजचा बायोलॉजी पेपर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून शिक्षण विभाग अंधारात आहे. .