Homeक्राईमबिंगो जुगार अड्ड्यावर छापा, ४ आरोपीसह २४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात डीवायएसपी संदीप...

बिंगो जुगार अड्ड्यावर छापा, ४ आरोपीसह २४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात डीवायएसपी संदीप मिटके यांचे पथकाची कारवाई

advertisement

श्रीरामपूर दि १३ फेब्रुवारी
श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच जवळ बिंगो जुगार चालवत असल्याची माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाल्या नंतर त्यांनी आपल्या पथकास त्या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी या बाबत सर्व माहिती काढून  नॉर्दन ब्रांच परिसरात सुरू असलेल्या बिंगो जुगरच्या अड्ड्यावर छापा टाकला असता या ठिकाणी रविंद्र बाळासाहेब चव्हाण,अशोक एकनाथ खंडागळे,बाबासाहेब शिवाजी कसबे ,शाहरुख मुक्तार पठाण हे बिंगो जुगार खेळताना आढळून आले पोलीस पथकाने या जुगार खेळणाऱ्यांसह 23,880/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सर्व  आरोपी विरुध्द  पो. कॉ. नितीन शिरसाठ  यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 83/2022 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक  स्वाती भोर, डीवायएसपी  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ. सुरेश औटी,पोलीस नाईक सचिन बैसाणे, पोकॉ.महादेव लगड ,पोकॉ नितीन शिरसाठ आदींनी केली.

अहमदनगर जिल्ह्यात सध्या बिंगो जुगाराचा सुळसुळाट झाला आहे या बिंगो मुळे अनेक तरुण जुगाराच्या आहारी गेले असून बिंगो जुगारात हरल्यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर सह अहमदनगर शहरामध्ये बिंगो जुगार खुले आम सुरू आहे मात्र हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत हे एक प्रश्न अनुउत्तरीत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular