बीड- दि. १८ डिसेंबर
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न आणि अहमदनगर बीड जिल्ह्यावासीय ज्या क्षणाची वाट पाहत होते अशी अहमदनगर बीड रेल्वे १७ डिसेंबरला अहमदनगर ते आष्टी अशी धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती .मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे १७ तारखेला धावणारी हायस्पीड रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे. सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता, विजयकुमार राय, सोलापूरचे चंद्रभागा सिंग, अहमदनगर येथील रेल्वे अधिकारी एस. सुरेश यांच्या उपस्थितीत सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर झालेल्या कामाचे उद्घाटन होणार होते. पुढील आठवड्यात २१ किंवा २२ तारखेला हि हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अनेक वर्षांपासून बीड जिल्हावासीय या रेल्वेची वाट पाहत होते आणि ती वेळ जवळ आली होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आता ही वेळ पुन्हा पुढे ढकलली आहे. मात्र लवकरच ही रेल्वे या मार्गावर धावणार असल्याने निश्चित हे स्वप्न पूर्ण होण्यास कुठेतरी सुरुवात होणार आहे.