HomeUncategorizedबैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लढणाऱ्या शिलेदारांचा सन्मान आमदार अरुण काका जगताप यांच्या...

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लढणाऱ्या शिलेदारांचा सन्मान आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते संपन्न

advertisement

अहमदनगर दि.२० डिसेंबर
आमदार अरुणकाका जगताप यांच्या वतीने अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती वरील बंदी उठवणे संदर्भात देश पातळीवर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सचिन जगताप यांनी  सांगितले की, २०११ पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्यासाठी काही शर्यत विरोधकांचे प्रयत्न चालू होते.

मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशामध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर तामीळनाडू कर्नाटक महाराष्ट्र मध्ये शर्यती चालू करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेने ग्रामीण संस्कृती व परंपरेचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती वरील बंदी उठवणे संदर्भात देश पातळीवर उल्लेखनीय कार्य केले. बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळे राज्यातील खिल्लार जातीच्या गोवंशाचे जतन-संवर्धन होणार आहे व ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. स्वर्गीय बलभीमअण्णा विठोबा जगताप यांच्या पासून ते आजच्या पिढीपर्यंत जगताप कुटुंबाने जातिवंत खिलार गाई बैल संगोपनाची परंपरा जपली आहे.

अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून याबाबत पाठपुरावा करून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती उठविण्यात संदर्भात देशपातळीवर उल्लेखनिय कार्य केले आहे म्हणून  आमदार अरुणकाका जगताप यांच्या वतीने अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जगताप कुटुंबाच्या वतीने तसेचसचिनभाऊ जगताप मित्र मंडळाच्या परिश्रमातून या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले गेले होते.यावेळीनितीन आबा शेवाळे संदीप बोदगे धनाजी तात्या शिंदे स्वातीताई धनाजी शिंदे, अनिल शेठ लांडगे भोसरी,महेश शेठ शेवकरी चाकण, रामकृष्ण टाकळकरबाळासाहेब आरुडे डॉक्टर प्रशांत भड डॉ शैलेश केंडे उपाआयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय, यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular