Homeक्राईमभर दिवसा गोळीबाराच्या घटनेने चापडगाव हादरले...

भर दिवसा गोळीबाराच्या घटनेने चापडगाव हादरले…

advertisement

शेवगाव दि.२१ जानेवारी
शेवगाव तालुक्यातील चापडगाव आज गोळीबाराच्या घटनेने हादरले.चापडगाव मधील नेहमीच वर्दळीच्या ठिकाणी भर चौकात काही अज्ञात लोकांनी गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली असून दोन दुचाकीवर आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

शनिवारी सकाळी ही घटना घडली.शेवगाव तालुक्याच्या शेजारून गोदावरी नदी वाहते त्या मुळे अवैध वाळू तस्करीचे मोठे रॉकेट या ठिकाणी कार्यरत असून वाळू तस्करी मध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक वेळा या भागात छोटे-मोठे भांडणं सुरूच असतात. तर एका फरार आरोपीला शोधण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला ीवे मारण्याची घटना शेवगाव तालुक्‍यात काही वर्षांपूर्वी घडली होती पोलिस दलासह संपूर्ण जिल्हा या घटनेने हादरला होता मात्र पुढे न्यायालयात या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटला हे विशेष.

त्यामुळे परिसरातील नागरिकांवर आणि पोलिसांवर वर्चस्व दाखवण्यासाठी हा प्रकार तर झाला नसेल ना अशी चर्चा या परिसरात सुरू आहे. या गोळीबारात गावठी कट्ट्याचा वापर झाला असून परमेश्वर पातकळ याच्या हाताला गोळी चाटून गेल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

शेवगाव तालुक्याच्या शेजारीच बीड आणि औरंगाबाद जिल्ह्याची हद्द आहे त्यामुळे औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील काही वाळू तस्कर या ठिकाणी नेहमीच गुंडागर्दी करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे .

गावठी कट्टा धारकांवर पोलीस अनेक वेळा कारवाई करतात मात्र हे गावठी कट्टे अत्यंत कमी किमतीत मिळत असल्याने जिल्ह्यात अनेक वाळूतस्कर गावठी कट्टे बाळगतात मात्र वर्चस्व सिद्ध करण्याच्या नादात जिल्ह्यात एखादी मोठी घटना घडू शकते त्यामुळे आता पोलिसांसमोर आता या वाळूतस्करांची दहशत कमी करण्याचं मोठं आव्हान आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular