नेवासा प्रतिनिधी-
नेवासा तालुक्यात सध्या महावितरण विभागाने थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा कारवाई सुरू केली आहे याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांनी महावितरण कार्यातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांच्या प्रसंगवधनाणे बाळासाहेब मुरकुटे थोडक्यात बचावले आहेत. नेवासा तालुक्यात सध्या पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून महावितरण कार्याने वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे त्यासाठी बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते मात्र महावितरण अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने अखेर बाळासाहेब मुरकुटे यांनी हे पाऊल उचलले