अहमदनगर दि.६ एप्रिल
भारतीय जनता पक्षाचा ४२ व्या स्थापना दिन देशभरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उत्साहात साजरे करत आहेत अलिकडेच लागलेल्या चार राज्यांतील निकालानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे बोटावर मोजण्याइतके खासदार होते तर राज्यात कुठेही सत्ता नव्हती मात्र आता थेट भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान भारतामध्ये आहे एवढी मोठी मजल भारतीय जनता पक्षाने काही वर्षांमध्ये गाठली आहे.
अहमदनगर दक्षिणचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीसुद्धा भाजपचा स्थापना दिन साजरा केला असून घरासमोर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाची भव्य रांगोळी काढून सजावट केली आहे लोणी येथील निवासस्थानी पक्षाचा झेंडा फडकवला आहे.सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.