Homeक्राईमभैय्या,मामा,दादा आशा फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांनो जरा जपूनच शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा...

भैय्या,मामा,दादा आशा फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांनो जरा जपूनच शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा केली फॅन्सी नंबर प्लेट वर कारवाई सुरू एकाच दिवसात चोवीस हजारांचा दंड केला वसूल.

advertisement

अहमदनगर दि.२४डिसेंबर
अहमदनगर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी शहरा मध्ये फॅन्सी नंबर प्लेट तसेच सायलेन्सर बदलून विचित्र आवाज काढणारे वाहने , विना लायसन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर कारवाई करत सुमारे २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंड होती. मात्र आता पुन्हा शहर वाहतूक शाखेने मोहीम सुरू केली असून विविध फॅन्सी नंबर प्लेट जप्त करत त्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच सध्या नगर शहरात बुलेट या वाहनाचे सायलेन्सर बदलून विचित्र आवाज काढत फिरण्याचे मोठी फॅशन झाली आहे. अशा सायलेन्सर बदललेल्या गाड्यांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात अली असून मोहीम अजून तीव्र होणार असल्याने नागरिकांनी दुचाकीवर प्रवास करताना वाहतुकीचे सर्व नियम पाळवेत हेल्मेटचा वापर करावा विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट वाहने चालवू नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र  भोसले यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular