नेवासा – प्रतिनिधी आदित्य सुकाळकर
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकररावजी गडाख यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ६० कोटी ६ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी साडे आठ वाजेपासून मंत्री शंकरराव गडाख यांचे हस्ते होणार आहे. तरी विकास कामांचा शुभारंभ बेलपिंपळगाव फाटा येथून ४७ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या श्रीरामपूर-नेवासे-शेवगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामाने होणार आहे.
त्यानंतर नेवासे शहरातील कडु गल्ली, श्री मोहिनीराज मंदिर, नगरपंचायत चौक, जुन्या उषा टॉकीज परिसर येथील एकूण ५ कोटी रुपये खर्चाच्या नेवासे नगरपंचायत अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरण, बंदिस्त गटार, पेव्हिंग ब्लॉक ही विविध विकासकामे होणार आहेत.
त्यानंतर जुन्या उषा टॉकीज शेजारी २ कोटी ४० लक्ष रुपये खर्चाच्या नेवासे-हंडीनिमगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी ६७ लक्ष रुपये खर्चाच्या नेवासा-हंडीनिमगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे. तसेच १ कोटी रुपये खर्चाच्या नेवासे-रानमळा ते एसटी डेपो रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. व काझीनाला येथे २ कोटी ४९ लक्ष रुपये खर्चाच्या नेवासे खडका रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे.
अशी विकास कामांचा शुभारंभ मंत्री गडाख यांचे हस्ते होणार आहे. तरी नेवासा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.