परभणी – दि १७ मार्च
पैठण येथील मटका किंग म्हणून ओळख असलेला आणि अनेक गुन्हे दाखल असलेला आबेद पठाण यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. १२ मार्च रोजी परभणी येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्ष प्रवेश करण्यात आला होता.

राजकारणात स्वच्छ चरित्र असलेल्या लोकांनाच प्रवेश जिला जात असल्याच्या वल्गना अनेक वेळा काँग्रेस पक्ष करत असतो भाजपला गुंडांचा पक्ष म्हणून काँग्रेसचे अनेक नेते वेळोवेळी आपल्या भाषणात उल्लेख करत असतात त्याचा काँग्रेस पक्षाने मटका किंग काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.





