Homeराजकारणमनपाचे वारातीमागून घोडे तीन दिवसापूर्वी डांबरीकरण झालेला रस्ता अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे खोदण्यात...

मनपाचे वारातीमागून घोडे तीन दिवसापूर्वी डांबरीकरण झालेला रस्ता अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे खोदण्यात आला.

advertisement

अहमदनगर दि.२ फेब्रुवारी

स्टेशन रोड वरील प्रभाग  क्रमांक 15 मधील रेल्वे स्टेशन परिसर येथील संभाजी हाउसिंग सोसायटी अंतर्गत रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ 10 दिवसा पूर्वी करण्यात आला तेथे 3 दिवसा पूर्वी रस्ता बनवण्यात आला या रस्त्यासाठी माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी आमदार निधीतून रस्ता मंजूर करून घेतला होता व त्या भागातील कंत्राटी पद्धतीने नेमलेला अभियंता गीते याने नवीन रस्ता खोदून तेथे पाईपलाईनचे काम चालू केले आहे ही निंदनीय बाब असून रेल्वे स्टेशन येथील रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित होता त्यावेळेस या अभियंत्याला काम करण्याची गरज होती व त्याला अनेक वेळा सूचना देखील देण्यात आले होते परंतु त्याच्या मनमानी कारभारामुळे हा रस्ता 3 दिवसा पूर्वी तयार झालेला रस्ता परत खोदण्यात आला आहे.

या आधी देखील दलित वस्ती चा रस्ता देखील अशाच पद्धतीने खोदण्यात आला होता रस्त्याचे काम पूर्ण होत  असतानाच या अभियंत्याला जाग येते त्यामूळे असे अधिकारी महानगरपालिकेमध्ये असतील तर महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी व्यक्त करुन या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular