Homeशहरमनपा आयुक्तांनी दावा केलेल्या १३३ रस्त्यांच्या यादीचे काँग्रेसने केले पोस्टमार्टम, तज्ञांची खाजगी...

मनपा आयुक्तांनी दावा केलेल्या १३३ रस्त्यांच्या यादीचे काँग्रेसने केले पोस्टमार्टम, तज्ञांची खाजगी समिती नेमून काँग्रेसची स्टिंग ऑपरेशनची घोषणा

advertisement

अहमदनगर दि ५ मार्च

मनपाने समाज माध्यमांवर १०० नव्हे १३३ रस्ते केल्याच्या दाव्याचे काँग्रेसने पोस्टमार्टम करीत या दाव्याची अक्षरशः चिरफाड केली आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली असून आयुक्त आणि मनपा प्रशासन हे खोटारडे असल्याचे पुन्हा एकदा स्वतः आयुक्तांनीच पुराव्यानिशी सिद्ध केले असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे. आयुक्तांनी दावा केलेल्या तथाकथित १३३ रस्त्यांची यादी यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या १३३ रस्त्यांसह शहरातील अन्य रस्त्यांचा देखील समावेश करत काँग्रेसच्यावतीने तज्ञांची खाजगी समिती नेमून मनपाने जाहीर केलेल्या तथाकथित रस्त्यांचे स्टिंग ऑपरेशन करणार असल्याची घोषणा काळे यांनी केली आहे. यामुळे मनपाला काँग्रेसने दणका दिला असून नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काळे यांच्यावर टक्केवारी मागितल्याचा आरोप सावेडीतील एका नगरसेविका पतीने नुकताच केला होता. त्यावर माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी हे आरोप धादांत खोटे असल्याचे सांगत नगर शहरामध्ये जनतेच्या पैशावर दरोडा घालत मनपा अधिकारी, ठेकेदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींकडून संगनमताने सुरू असणाऱ्या लुटीवर काळे नगरकरांच्या हितासाठी निर्भीडपणे आवाज उठवतात. म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र शहरात सुरू झाले असल्याचा आरोप केला आहे.

व्यापाऱ्यांच्या बाजारपेठेतील स्वाक्षरी मोहीम व आयुक्तांसमवेत काँग्रेस शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसने रस्त्यांचा प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. काळे यांनी म्हटले आहे की, रासने नगर ते प्रेमदान चौक हा रस्ता क्र.४९ व क्र.११६ असा दोन वेळा यादीत दाखवलेला आहे. क्र. ३१ व क्र.८५ हा हॉटेल राज पॅलेस येथील रस्ता असून हा एकच रस्ता असताना दोन ठिकाणी दाखविण्यात आला आहेत. आयटीआय ते कोहिनूर अपार्टमेंट हा एकच रस्ता असून तो देखील क्र. २० व क्र.९० अशा दोन ठिकाणी दाखविला आहे. वाडीया पार्क ते जुने मनपा कार्यालय ते पाचपीर चावडी ते मदरशहापीर हा रस्ता क्र.९३ मध्ये नमूद असून याच केलेल्या रस्त्यातील जुने मनपा ते पाचपीर चावडी हा रस्ता पुन्हा दुसर्‍यांदा केला असून तो क्र. ९४ म्हणून जाहीर केला आहे. एकाच रस्त्याची दोन-दोन वेळा मनपाने बिले काढली आहेत की काय ? असा संतप्त सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.

केवळ आकड्यांची संख्या वाढवण्यासाठी एकाच रस्त्याचे अनेक तुकडे करून नावांची संख्या वाढविलेली आहे. यादीतील क्र. ५ ते ७ हा जीपीओ चौक ते धरती चौक असा एकच अखंड रस्ता असताना त्याचे तीन तुकड्यात नाव लिहलेले आहे. नगर शहराच्या रस्त्यांच्या कामांमध्ये मोठं काळबेर झाल असून काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरकरांच्या पैशांची लूट मनपा अधिकारी, ठेकेदार, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना करू देणार नाही, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

काँग्रेस नेमणार तज्ञांची खाजगी समिती :
महापालिकेने जाहीर केलेल्या १३३ रस्त्यांसह शहरातील अन्य रस्त्यांचे देखिल स्टींग ऑपरेशन करणार असून यासाठी तज्ञांची खाजगी समिती नेमणार आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनियर, काँग्रेस पदाधिकारी, जागरूक नागरिक, युवक- युवती, महीला, जेष्ठ नागरीक यांचा समावेश केला जाणार असून मनपाचा भांडाफोड करून शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांचे नागरिकांसमोर पितळ उघडे करणार असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.

हे काम करत असताना माझ्यावर आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कोणी कितीही खोटेनाटे आरोप करत आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भीक घातली जाणार नाही, असा सज्जड इशारा काळे यांनी दिला आहे. काँग्रेसच्या समितीच्या घोषणेमुळे संबंधितांचे मात्र धाबे दणाणले असून काँग्रेसच्या स्टिंग ऑपरेशनची शहरभर चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे.

काँग्रेसच्या भूमिकेने मनपातील सत्ताकारणाला तडा :
मनपाने जाहीर केलेल्या यादीवर मनपा आयुक्तांसह शिवसेना महापौर, राष्ट्रवादी उपमहापौर यांची नावे आहेत. मनपामध्ये जरी महाविकासआघाडी असल्याचे बोलले जात असले तरी देखील काँग्रेसचे मनपातील बहुतांशी नगरसेवक हे काँग्रेसशी प्रामाणिक नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यातच शहर जिल्हा काँग्रेसने रस्त्यांच्या विषयावर घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे मनपातील महाविकास आघाडीच्या सत्ताकारणाला तडा गेला असल्याची चर्चा झडू लागली आहे. यावर बोलताना किरण काळे यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाची बांधिलकी ही कुणाच्या दावणीला नसून नगर शहरातील सर्व घटकांतील सर्वसामान्य नागरिकांशी आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular