Home जिल्हा मनमाड जवळील हडबीची शेंडी वर गिर्यारोहकांच्या पथकाला अपघात होऊन तांत्रिक पथकातील दोघेजण...

मनमाड जवळील हडबीची शेंडी वर गिर्यारोहकांच्या पथकाला अपघात होऊन तांत्रिक पथकातील दोघेजण दगावले तर एक गिर्यारोहक गंभीर जखमी.

मनमाड दि.२ फेब्रुवारी

अहमदनगरच्या इंद्रप्रस्त ट्रेकर्स या कमर्शियल ग्रुपच्या वतीने हडबीची शेंडी या सुळक्यावर आरोहण मोहीमेचे आज आयोजिन करण्यात आले होते. १८ जण यात सहभागी झाले होते, त्यात काही मुलींचाही सहभाग होता.

दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटचे तीघे जण उतरण्याच्या बेतात असताना तांत्रिक पथकाचा प्रमुख अनिल वाघ आणि मयूर मस्के हे दोघे खाली कोसळले, त्यातला एक जण जागीच गतप्राण झाला.

जखमी प्रशांत पवार यास मनमाड येथे उपचारासाठी साठी तातडीने हलविण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच कातरवाडी येथील ग्रामस्थ भागवत झालटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित हडबीची शेंडी वर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

ग्रामस्थांनी राबविलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळपर्यंत खाली आणण्यात आले होते. मृतांचे शव मनमाड येथे आणण्यात आले अशी माहिती मनमाडचे गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version