Homeजिल्हामराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मनसेची मागणी नेवासा येथे मनसे तर्फे राबवण्यात...

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मनसेची मागणी नेवासा येथे मनसे तर्फे राबवण्यात अली सह्यांची मोहीम

advertisement

नेवासा दि ४ मार्च
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नेवासा
येथे मराठी राज भाषा दिनानिमित्त तीर्थक्षेत्र मराठी भाषेची जन्मभूमी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मराठी सह्यांची मोहीम सुरू झाली. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या पटांगणात ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थित त्यांच्या सहीने मराठी सह्याच्या सुरुवात करण्यात आली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात मराठी सह्यांची मोहीम राबविण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते सचिन गव्हाणे यांनी दिली.

या सह्यांच्या मोहिमेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. अनेकांनी मराठी अस्मितेबद्दल मनोगत व्यक्त करून या मोहिमेचे कौतुक केले. यावेळी महिला सेना तालुकाध्यक्षा
मीरा गुंजाळ,तालुका संघटक किरण शिंदे, मनसे सहकार सेनेचे पप्पू जायगुडे,संतोष गव्हाणे, सचिन गव्हाणे, दीपक परदेशी, अमोल कपिले,सतीश भोसले, फिलगुडचे संचालक डॉ. भारत कर्डक, सचिन मोरे,आदींसह नागरिक उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular