अहमदनगर दिनांक १८ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मेळाव्याचे आयोजक माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे आजी माजी आमदारांची उपस्थिती होती. केंद्रामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय सहकारमंत्री पद निर्माण करण्यात आले.यानंतर सहकाराशी मोठ्या प्रमाणावर संबंधित असलेल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच अमित शहा यांनी लोणी येथे येऊन सहकार परिषद घेतली. मात्र या सहकार परिषदेला सहकारामध्ये प्रचंड काम करणाऱ्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या आणि केंद्रामध्ये सध्या खासदार असलेल्या शरदचंद्रजी पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनाही या सहकार परिषदेचे निमंत्रण नव्हते याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत ही परिषद भारतीय जनता पक्षाची सहकार परिषद आहे.अशी टीका करत जर मला या परिषदेला बोलले असते तर केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या कानावर काही गोष्टी घालता आल्या असत्या असे त्यांनी सांगितलं. बँकेला मल्टीस्टेट चा दर्जा देताना याचा विचार करणे गरजेचे आहे कारण मल्टीस्टेट दर्जा देणे म्हणजे खाजगी कंपनी प्रमाणे कामकाज चालवल्या प्रमाणेच आहे. तसेच घटनेची पायमल्ली करत काही कायदे सहकारामध्ये बनवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.मल्टीस्टेट मुळे थेट निवडणुकीवर याचा परिणाम होऊन संचालक म्हणतील तेच उमेदवार निवडणुकीला उभे राहू शकेल असेही काही काळानंतर होऊ शकते. अशा अनेक गोष्टी सहकारमंत्र्यांच्या कानावर घातल्या असत्या मात्र त्यांनी आम्हाला बोलावलं नाही त्यामुळे ही परिषद फक्त भारतीय जनता पार्टीचे सहकार परिषद होती अशी टीका त्यांनी केली
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा