Homeशहरमहानगरपालिकेचे सन २०२२-२३ चे ८०२ कोटीचे मुळ अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने शुक्रवारी स्थायी...

महानगरपालिकेचे सन २०२२-२३ चे ८०२ कोटीचे मुळ अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीस सभापती कुमार वाकळे यांचेकडे आयुक्त शंकर गोरे यांनी सादर केले.

advertisement

अहमदनगर दि ११ मार्च

अहमदनगर महानगरपालिकेचे सन दोन हजार बावीस तेवीस सात आठशे कोटींचे मूळ अंदाजपत्रक आज महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी समितीचे अध्यक्ष सभापती कुमार वाकळे सुथोयांच्यासमोर सादर केले यावेळी स्थायी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. ३७३ कोटी ९१ लाख, भांडवली जमा रु. ३७२ कोटी ०४ लाख धरणेत आले आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी रु. ५१ कोटी २२ लाख,सुथो संकलीत करावर आधारीत करापोटी ६७ कोटी २१ लाख, जी एस टी अनुदान १११ कोटी ६७ लाख व इतर महसुली अनुदान रु. २७ कोटी ६५ लाख,गाळा भाडे ३ कोटी, पाणीपट्टी २६ कोटी ४० लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी ४२ कोटी, संकीर्णे २४ कोटी ८० लाख़ इ. महत्वाच्या आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन रु. ३७२ कोटी ०४ लाख अंदाजित जमा होणार सुथो आहेत. तसेच खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १२६कोटी ३६ लाख, पेन्शन ४२ कोटी व ७७ लाख, पाणी पुरवठा विज बिल ३३ कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ३ कोटी, शिक्षण मंडळ वर्गणी ४ कोटी ३० लाख, महिला व बाल कल्याण योजना १ कोटी ६० लाख, अपंग पुनर्वसन योजना १ कोटी ६० लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ५ कोटी २५ लाख, मा. सदस्य मानधन १ कोटी ५० लाख, औषधे व उपकरणे १ कोटी, मा. सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ७ कोटी ४७ लाख, कचरा संकलन व वाहतूक ३ कोटी ,पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती ६० लाख, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी १ कोटी ७० लाख, अशुध्द पाणी
आकार २ कोटी, विविध वाहने खरेदी २ कोटी ३०, नविन रस्ते १५ कोटी, रस्ते दुरुस्ती १२ कोटी, इमारत दुरुस्ती ५० लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई ४५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ४० लाख, कोडवाड्यावरील खर्च २० लाख, वृक्षारोपन सुथो तदनुषंगिक खर्च ८५ लाख,हिवताप प्रतिबंधक योजना ४० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी ४१ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त १ कोटी ३५ लाख यासह इतर बाबींबर खर्च प्रस्तावित केलेला आहे.

तसेच शहरवासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी नविन रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, विज, पाणी या सेवा चांगल्या दर्जाच्या देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीतील कामे पूर्णत्वास नेणे व नविन कामांसाठी शासन निधी मिळविणे, मनपा हिस्स्याची रक्कम भरणे इ. कामे तसेच घनकचरा संदर्भातील कामे, चितळेरोड भाजी मार्केट जागा विकसीत करणे, नाट्यगृहचे बांधकाम पूर्ण करणे, मिटरद्वारे पाणी पुरवठा, शहर स्वच्छता अभियान, गतिशिल प्रशासन, तसेच शहर व उपनगर मधील भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, सहायक आयुक्त सचिन राऊत, मुख्यलेखाधिकारी शाहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

या अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी आजची स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली असून सोमवारी १४ मार्च ला पुन्हा ही सभा होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांनी दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular