अहमदनगर दि.७ जानेवारी
अहमदनगर शहरामध्ये नायलॉन मांजा म्हणजेच चायना मांजाची जोरात विक्री चालू असल्याची बातमी आवाज महाराष्ट्राने प्रसारित केल्यानंतर सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने आज महानगरपालिकेच्या दक्षता पथकाने चितळे रोड परिसरात तसेच तोफखाना बागड पट्टी परिसरात लागलेल्या पतंग मांजा स्टॉलवर जाऊन स्टॉलची तपासणी केली.
याठिकाणी चायना व नायलॉन मांजा विक्री करु नये अशी सक्त ताकीद महानगरपालिकेच्या दक्षता पथकाने मांजा विक्रेत्यांना दिली आहे.जर कुठे नायलॉन अथवा चायना मांजा विक्री करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यामुळे पतंग मांजा विक्रेत्यांनी चायना मांजा आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये असे आवहान महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान यांच्यासह दक्षता पथकातील नंदकुमार नेमाणे,राहुल साबळे,राजेंद्र बोरुडे,अमोल लहारे,विष्णू देशमुख,राजू जाधव,भास्कर आकुबत्तीन,गणेश वरुटे,रिजवान शेख,विष्णू मिसाळ,नंदकुमार रोहकले,भीमराज कांगुडे,गणेश धाडगे,अनिल कोकणे यांच्या पथकाने विविध स्टॉल वर जाऊन तपासणी केली.
तसेच जोपर्यंत हे विक्रीचे दुकाने मांजा विक्रीसाठी उपलब्ध असतील तोपर्यंत वेळोवेळी हे पथक अचानक तपासणी करण्यासाठी या स्टॉलवर जाणार असल्याची माहितीही समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.