Homeराजकारणमहिला अत्याचार प्रकरण जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सेना जिल्हाध्यक्षांकडून जीविताला धोका रिपब्लीकन...

महिला अत्याचार प्रकरण जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सेना जिल्हाध्यक्षांकडून जीविताला धोका रिपब्लीकन पार्टीच्या शहर अध्यक्षांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

advertisement

अहमदनगर दि.२३ डिसेंबर
अहमदनगर शहरातील एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली जेऊर येथील शिवसेनेच्या गोविंद मोकाटे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत असून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणाचे मास्टरमाइंड म्हणून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले असल्याचं आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.तर आता या प्रकरणातील महिलेला सहकार्य करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले असून आपल्या जीविताल धोका असल्याचे नमूद केले आहे
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे,जिल्हापरिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या पासून धोका असून या सर्वांनी मिळून पत्रकार परिषदेमध्ये हा गुन्हाच खोटा असल्याचा वक्तव्य केलं होतं. एका महिलेवर अन्याय होत असताना ती महिला माझ्याकडे न्याय भेटवा म्हणून मदत मागण्यासाठी आली होती. तिला मी सद्भावनेने मदत करून गुन्हा दाखल करण्यासाठी सहकार्य केलं होतं. आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती मात्र आता ही सर्व राजकीय नेते ही घटना खोटी असल्याचे सांगत असल्याने उद्या माझ्या जीविताचे काही बरे वाईट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्या जीविताला काही झाल्यास वरील लोकांवर जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular