कोल्हापूर दि.२६ डिसेंबर
कोल्हापुरच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून त्यानी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असता तृप्ती मुळीक यांनी अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. व्हीआयपी ड्रायव्हिंग करण्याचा आजचा पहिला दिवस असला तरी तृप्ती यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता आपली जबाबदारी बिनधास्तपणे पार पाडली. मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करणारी पहिली महिला कॉन्स्टेबल ठरल्या आहेत.तृप्ती मुळीक यांचे कौतुक अजित पवार यांनीही केले असून अजित पवार यांच्याबरोबर गाडी चालवतानाचे फोटो खूप ठिकाणी वायरल झाले आहेत. मात्र महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हेच या फोटो वरून आज सिद्ध झाले आहे.तृप्ती मुळीक यांचं पोलिस दलासह इतरांनीही कौतुक केल आहे.