Homeक्राईममाजनुगिरी अली अंगलट  'तु मला आवडतेस' म्हणत अल्पवयीन मुलीस छेडणाऱ्या दोघांना जेलची...

माजनुगिरी अली अंगलट  ‘तु मला आवडतेस’ म्हणत अल्पवयीन मुलीस छेडणाऱ्या दोघांना जेलची हवा..कर्जत पोलिसांची तत्पर कारवाई

advertisement

कर्जत दि ६ मार्च

कर्जत येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या कर्जत शहराच्या बाहेरून शिक्षणा साठी येणाऱ्या एका तरुणीस काही हुल्लडबाजी करणारे मुलं नेहमी छेडत होते.

महाविद्यालयाच्या तसेच घरी जाण्यायेण्याच्या ठिकाणी ही टारगट मुले छेडण्याचा प्रकार वाढल्याने अखेर त्या मुलीने 4 फेब्रुवारी रोजी ही गोष्ट फोनवर आपल्या भावाला कळवली त्या अल्पवयीन मुलीच्या भावाने तात्काळ मुलगी ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी धाव घेत आपल्या बहिणीला त्रास देणाऱ्या त्या टारगट मुलांना जाब विचारला मात्र आपल्याला जाब विचारणारा मुलीचा भाऊ असल्याचे लक्षात येताच त्या मुलांनी तिथून पळ काढला होता.

ही माहिती कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना कळताच त्यांनी आपले सहकारी कर्मचारी पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली होती मात्र तोपर्यंत मुलीची छेड काढणारे ते दोन टारगट मुले तिथून पळून गेले होते पोलिसांनी याबाबत त्या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन धीर देत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास सांगितले तिच्या तक्रारी नुसार पोलिसांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये प्रथम अज्ञात आरोपींवर विनयभंग भा.द.वी. कलम ३५४ (अ)(ड) तसेच (पोस्को) बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२ चे कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली सीसी टीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या माहिती वरून काही तासातच या अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या ईश्वर जयराम हुलगुंडे (रा. खंडाळा ता.कर्जत) व विजय हुलगुंडे (रा.गोयकरवाडी ता.कर्जत) या दोघांना अटक केली आहे.

शाळा महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी मुलींना महिलांना छेडण्याचे प्रकार होत असतील तर तात्काळ कर्जत पोलिस स्टेशन संपर्क साधून अशा टारगट मुलांची नावे अथवा त्यांचे गाडी नंबर कळवावे त्यामुळे पोलिसांना अशा टारगट मुलांवर कायदेशीर कारवाई करण्यास अडचण होणार नाही असे आवहान कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत मधील महिला, विद्यार्थी, नागरिकांना केले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular