HomeUncategorizedमाजी मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा जोर का...

माजी मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा जोर का झटका कर्जत नगरपंचायत निवडणूकी आधीच भाजप पिछाडीवर. भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी घेतली माघार

advertisement

अहमदनगर दि.१३ डिसेंबर
माजी मंत्री राम शिंदे यांना कर्जतमध्ये मोठा धक्का बसला असून नगरपंचायतीच्या निवडणुकीतील भाजपच्या काही अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी राम शिंदे यांना जोर का झटका दिल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत असलेल्या  उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने भाजपला चांगला धक्का बसला आहे. भाजपच्या शहर अध्यक्षांच्या पत्नीने माघार घेतल्याने हा सर्वात मोठा धक्का आहे .मागे घेतलेल्या उमेदवारांना राम शिंदे यांनी या उमेदवारांना चांगलेच फैलावर घेतले होते मात्र हा चमत्कार कसा झाला याबाबत आता कर्जत मध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे. रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची चुणूक या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला असून थेट त्यांचे उमेदवारांनीच मागे घेतल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. राम शिंदे यांची निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली.भाजपा उमेदवारांवर दबाव टाकून माघार घेण्यास सांगितले जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. या घटनेनंतर राम शिंदे यांनी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरासमोर मौनव्रत धारण केले आहे.विशेष म्हणजे विधानसभेनंतर कर्जत जामखेड तालुक्यात कर्जत नगरपंचायत तिची मोठी निवडणूक होती माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आघाडीने या निवडणुकीची धुरा सांभाळली आहे. मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना धोबीपछाड दिल्याचे बोलले जातेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular