अहमदनगर दि.२९ मार्च
आयपीएल सिझन सुरू झाला आणि बुकींची चंगळ सुरू झाली. नगर शहरात खूप नामचीन बुकी दरवर्षी सट्टेबाजीचा धंदा करतात तास त्यांचा हा धंदा चालूच असतो मात्र आयपीएल सिझन म्हणजे दिवाळी असते.
अगदी नाणेफेकी पासून प्रत्येक बॉल वर पैसे लावले जातात मग त्यात षटकार, चौकार, फंदाजाचे आउट होणे , आणि धाव संख्येवर सुद्धा पैसे लावले जातात काही मिनिटात लाखो रुपयांतपासून कोटी वर हा व्यावहार होत असतो. दरवर्षी आयपीएल सिझन मध्ये पोलीस मोठ्या प्रमाणावर कारवाई करत असतात मात्र सट्टेबाजी थांबत नाही.
नगर शहातही दिवाळी सुरू झाली असून मफु चौकातील मायेच्या पर्वताखाली सर्व बुकिंचे गोकुळ आनंदाने नांदत असते तर सावेडी भागातील डोशी अराम का मामाला है म्हणत जोरात काम करतो आहे.
या आयपीएल सिझन मध्ये काही घोटाळेबाज बुकी पण चांगलीच चांगळ करून घेतात कारण हा खेळ सर्व विश्वासावर असतो त्यामुळे छापा पडल्याचा बनाव करून सब माल डब्बेमें करून शांतीला धरतात मागील आयपीएल सिझन मध्ये असा प्रकार नगर शहारत घडला होता.
त्याच बरोबर यादी प्रकार सुद्धा मागील वर्षा पासून सुरू झाला असून बुकींची यादी बनवून त्यांना हजेरी लावण्याचे फर्मान सध्या सुटले आहे अनेकांना आशा टॉकीज ठेप्यावर हजेरी लावण्यास बोलवले जातेय.
तर सोमवारी रात्री धीरूभाईच्या गोलंदाजीवर वी आणि त्याच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या साथीदाराने तीन लाखाचा षटकार ठोकला आहे.
आयपीएलची गोलंदाजी आणि फलंदाजी आताशी कुठे सुरू झाली आहे पुढे अनेक मोठं मोठे षटकार पाहायला मिळणार असून त्यासाठी आपली हद्द सोडून दुसऱ्या हद्दीतील खेळाडूंना साध्य फोन सुरू झाले आहेत.
पर्वताखाली नांदणाऱ्या सर्वांचेच भले करण्यासाठी अंकलने सतिषसह वस्तीवरच्या बुकींना घेऊन ये आराम का मामला हैं म्हणत आयपीएल सफरीची सुरुवात केली आहे.