HomeUncategorizedमिरवणुकी दरम्यान गोंधळ घालणाऱ्या पन्नास लोकांविरुद्ध गुन्हा दाखल तेरा जण पोलिसांच्या ताब्यात...

मिरवणुकी दरम्यान गोंधळ घालणाऱ्या पन्नास लोकांविरुद्ध गुन्हा दाखल तेरा जण पोलिसांच्या ताब्यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश

advertisement

अहमदनगर दि.१५ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान गुरुवारी रात्री कापडबजार परिसरातील लोकसेवा हॉटेल समोर आणि परिसरात दोन गटात झालेल्या वादावादी नंतर किरकोळ दगडफेक झाली होती या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहहयक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्या फिर्यादीवरून शबाब शहानवाज शेख वय.34 रा.बाबा बंगाली अहमदनगर ,फरहान फैरोज खान वय.19 रा. हिना पार्क मुकुंदनगर अहमदनगर , मुजाहीद हुसेन शेख वय.21 रा.सर्जेपुरा
कौलारु समाज मंदिराजवळ अहमदनगर ,इरफान शकील शेख वय.29 रा. मिरा मेडीकल शेजारी तेलीखुंट अहमदनगर,सोयब नादीर शेख वय.33 रा.फकीर गल्ल्ली
सर्जेपुरा अहमदनगर ,आरिफ आसिफ सय्यद रा.21 रा.बडी मरीयम मस्जीद मुकुंदनगर अहमदनगर ,शाकीब अन्सार सय्यद वय.21 रा.आलमगीर मैदान मुकुंदनगर अहमदनगर ,दानिश शकील सय्यद वय..22 रा.दरबार चौक मुकुंदनगर,तहा अनवर खान वय.21 रा.पाचलिंब गल्ली लोकसेवा हॉटेलमागे अहमदनगर ,मोहसीन युसुफ शेख वय.19 वर्षे रा बडी मस्जीद मुकुंदनगर अहमदनगर ,आसिफ रियाज शेख वय.19 रा.नॅशनल कॉलनी मुकुंदनगर अहमदनगर ,अदनान हुसेन शेख
वय.18 रा.घासगल्ली कोठला अहमनगर , समी जावेद पठाण वय.19 रा.आयशा मस्जीद समोर मुकुंदनगर अहमदनगर व इतर अंदाजे 50 ते 60 इसम यांच्या विरोधात भा.द.वि कलम 308, 353, 332, 333, 153, 153 (अ),505(2), 323, 143, 146, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिरवणुकी दरम्यान आशा टॉकीज चौक आणि कापडबजार दंगा प्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून भिंगार पोलीस ठाण्यात सुद्धा एक गुन्हा दाखल झाला आहे.

शहारात शांतता टिकावी म्हणून पोलीस अतोनात प्रयत्न करत आहेत शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक मोहल्ला बैठक ज्या लोकांवर मागील काही प्रकरणात गुन्हे दाखल आहेत अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे मात्र एवढे करूनही पोलिसांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी सोडत आहेत या समाजकंटकांच्या मागे कोणती अज्ञात शक्ती आहे ते त्यांना शोधून काढणे गरजेचे आहे आणि त्या अज्ञात शक्तीला ठेसण्याची गरज असून त्यामुळेच शहरात शांतता प्रस्थापित होऊ शकते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular