HomeUncategorizedमुख्यबाजार पेठ प्रश्ना बाबत थेट आमदार नितेश राणे यांचे लक्ष नितेश राणे...

मुख्यबाजार पेठ प्रश्ना बाबत थेट आमदार नितेश राणे यांचे लक्ष नितेश राणे यांच्या भेटी नंतर सोशल मिडीयावर होतायेत काही पोस्ट व्हायरल पोलिसांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे

advertisement

अहमदनगर दि १३ एप्रिल
अहमदनगर शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापारी विरुद्ध रस्त्यावर बसणारे पथविक्रेते यांच्यामध्ये वाद सुरू आहे या प्रकरणांमध्ये आता थेट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येऊनही लक्ष घातल्याने हा विषय फक्त शहराचा नसून राज्याचा विषय झाल्यासारखं वातावरण निर्माण झाले आहे.

नितेश राणे हे अहमदनगर दौऱ्यावर असताना त्यांनी कापड बाजारामधील व्यापाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या गोष्टीचा उल्लेख करत शहरातील व्यापारी भयभीत असल्याचा सांगितलं कापड बाजारामध्ये महिलांची छेडछाड होत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलतांना केला.

या त्यानंतर सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत असून यामुळे पुन्हा एकदा शहरात वातावरण गढूळ होण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन व्यापारी आणि रोडवर बसणाऱ्या हातगाडीवर वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या पथकविक्रेते बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यांना कापड बाजारा शेजारीच कुठेतरी जागा देणे गरजेचे असताना प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते का? असा सवाल सध्या उपस्थित होतोय.

महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे कारण या दोन्हीचा फायदा घेऊन शहरातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे चुकीच्या गोष्टी आणि पोस्ट फॉरवर्ड करताना काळजी घ्या अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

08:05