अहमदनगर दि ४ एप्रिल
अहमदनगर शहरातील काही अपप्रवृत्ती विरुद्ध ताबा या सदरा खाली लेखमाला सुरू केली होती आणि ताबा कशा प्रकारे घेतला जातो कशा प्रकारे त्रास दिला जातो आणि यातून ही प्रवृत्ती कशी वाढीस लागली जाते या बाबत सविस्तर लेखमाला लिहून जनमानसात जागृती करण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रव्रुत्ती विराधात पोलिसात तक्रार द्या असे आवाहन केले होते .
ताबा मालिका झाल्या पासून अनेकांची पळता भुई थोडी झाली असून अनेक ताबा प्रकारणा मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या कडे धाव घेतली आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुद्धा आलेल्या नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून काही तक्रारीत त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले आहेत.
शहरातील एका वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका प्रतिष्टीत माणसाच्या मोकळ्या प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला गेला होता या बाबत त्या वैदयकीय व्यवसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती मात्र तेथील अधिकारी आणि पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या त्या कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्या नंतर आणि तुम्ही त्यांच्या सोबत मिटिंग घ्या असे निरोप अनेकवेळा त्या पांढऱ्या कपडे वल्याने दिल्याने वैतागून त्या प्रतिष्ठित व्यक्तीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सर्व हकीकत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सांगितली.
कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सर्व कागदपत्रांची छाननी करून हा प्रकार ताबा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहह्याक पोलिस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते वैद्यकीय क्षेत्रातील त्या प्रतिष्ठित माणसाच्या तक्रारीवरून बळजबरीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे तसेच 50 लाख रुपयांची खंडणी मागणे हात-पाय तोडण्याची धमकी देणे याबाबतचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.